
दोडामार्ग : काल परवा आमच्या मांडीला मांडी लावून बसणारे भाजप सेना युती पक्षाने विकास कामांचा निधी कसा आणला नारायण राणे,दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाण यासारख्या मंत्र्यांनी जिल्ह्याचा विकास कसा केला असे सांगणारे राजन तेली आज दुसऱ्या पक्षात गेले त्यांचं डिपॉझिट जप्त करण्याचा संकल्प आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी केला आहे असे दोडामार्ग शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी कोकणसाद लाईव्ह शि बातचीत करताना सांगितलं. तळमळ तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर शासकीय इमारती या ठिकाणी नव्हता त्या सर्व इमारती दीपक भाई यांच्या माध्यमातून आज दोडामार्ग साठी मिळाले आहेत. दीपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यासाठी भरघोस असा निधी दिला आहे. मात्र तो त्यांनी जाहीरपणे कधी प्रसिद्ध केला नाही. ते प्रसिद्धी घेण्यापेक्षा काम करत असतात हा त्यांचा मोठेपणा आहे. असे गणेश प्रसाद गवस म्हणाले त्यांच्या सोबत युवा तालुका प्रमुख भगवान गवस, सोशल मीडिया प्रमुख गोपाळ गवस, उपतालुका प्रमुख रामदास मेस्त्री, मायकल लोबो, अमर राणे, शाखाप्रमुख अभिषेक गवस, अशोक गवस आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
महायुती म्हणून आजच्या घडीला तर सर्व भाजपचे पदाधिकारी आमच्या बाजूने आहेत. विशाल परत जर अपक्ष राहत असतील तर भाजपचे वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढतील आणि महायुतीत राहून मदत करण्याचे सांगतील महायुतीचा विजय निश्चित आहे विजय आपलाच असेही गणेश प्रसाद गवस म्हणाले.