ठाकरे शिवसेनेच्या सार्वजनिक नवरात्र उत्सव कमिटीची निवड

अध्यक्षपदी संदेश निकम तर सचिव पदी अजित राऊळ
Edited by: दिपेश परब
Published on: September 21, 2024 12:57 PM
views 110  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या सार्वजनिक नवरात्रौत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी संदेश निकम, उपाध्यक्षपदी सुजित चमणकर, सचिव पदी अजित राऊळ तर खजिनदारपदी प्रकाश गडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.    वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या कार्यालयात सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२४ पार पडण्या संदर्भात तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे शिवसेनेच्या तालुका मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली.  

   या बैठकीत प्रतिवर्षाप्रमाणे साजरा केल्या जाणाऱ्या सार्वजनिक नवरात्र उत्सव नियोजन कमिटीची निवड एकमताने करण्यात आली. या कमिटीत  उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांची अध्यक्षपदी, उभादांडा विभाग प्रमुख सुजित चमणकर यांची उपाध्यक्षपदी, वेंगुर्ले शहर प्रमुख अजित राऊळ यांची सचिव पदी तर आडेली येथील उपजिल्हा प्रमुख प्रकाश गडेकर यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली आहे.  तसेच सल्लागार म्हणून तालुकाप्रमुख यशवंत परब, हेमंत मलबारी, संदीप केळजी अजय सारंग, उप तालुकाप्रमुख उमेश नाईक, विवेक आरोलकर, अँड. जी.जी. टांककर, सुधाकर राणे, संदीप पेडणेकर, अभिमन्यू भुते, प्रसाद माडये, करण राऊत, सुहास मेस्त्री, सचिन मांजरेकर, तुषार कामत, मकरंद गोंदयाळे, यांची तर व्यवस्थापन कमिटीवर पंकज शिरसाट, अस्मिता राऊळ, मंजुषा आरोलकर, सुकन्या नरसुले, कोमल सरमळकर, डेलीन डिसोजा, सुमन निकम, अरुणा माडये, चैत्राली बागायतकर, शैलेश परुळकर, गजानन गोलतकर, सुरेश वराडकर, मिथुन सातार्डेकर यांची तर दुर्गामाता पूजन कमिटीवर दिलीप राणे व अभिनय मांजरेकर यांची निवड एकमताने करण्यात आली असल्याची महिती शहरप्रमुख अजित राऊळ यांनी दिली आहे.