गणरायाला सहस्र मोदकांचा नैवेद्य !

Edited by: विनायक गांवस
Published on: September 21, 2024 12:41 PM
views 47  views

सावंतवाडी : वैश्यवाडा सावंतवाडी येथील श्री हनुमान मंदीर येथील 21 दिवसांचा सार्वजानिक गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात व भक्तिमय वातावरणात सुरू आहे. गणेशोत्सवातील आजच्या संकष्टी चतुर्थीच्या निमीत्ताने वैश्यवाडा येथील भाविकांनी सुमारे 4960 मोदकांचा नैवेदय श्री चरणी अर्पण केला .      

 वैश्यवाडा येथील गणराया समोर गणेशोत्सवातील संकष्टी निमित्त सकाळी पुरोहित गणेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली  सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. त्यानतंर दुपारी महाआरती करण्यात आली. तदनंतर श्री चरणी सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावेळी विकास सुकी व महावीर चेंडके यांनी श्रींची पूजा केली. गणेशोत्सवात रोज भजनादी कार्यक्रम सुरू असून त्यात राजेंद्र म्हापसेकर, योगेश टोपले, म्हापसेकर बंधू, शरद सुकी, महावीर चेंडके, प्रकाश मिशाळ, झकास मित्र मंडळ, धोंडी दळवी, वैभव म्हापसेकर,प्रकाश सुकी वगैरें भजनाचे मानकरी आहेत. तर लघुरुद्र सेवा दीपक म्हापसेकर, पंचखाद्य प्रसाद डॉ. दादा केसरकर यांचे कडून होणार आहे. 

भव्यदिव्य विसर्जन मिरवणूक हे या मंडळाचे खास वैशिष्ट्य असून शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रींची भव्यदिव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात पंढरीची वारी ही संकल्पना राहणार असून यात मर्दानी खेळ, फुगड्या, पखवाज वादन, वारकरी भजन आदींचा समावेश असणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव कमिटी तर्फे करण्यात आले आहे.