
सावंतवाडी : शहरात घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून अकार, २१ दिवस गणरायांची प्रतिष्ठापना केली जाते. या मंडळातर्फे धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
शहरातील सालईवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडाचा गणपती हा कोकणातील पहिला सार्वजनिक गणपती आहे. गेली दोन वर्ष राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं मानकरी हे मंडळ ठरलं आहे. २१ दिवस या ठिकाणी उत्साहाच वातावरण असतं. यंदा भक्त पुंडलिकाचा देखावा गणरायाच्या चरणी साकारण्यात आला आहे. सालईवाडा येथील भट्टीवाडा गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा विराजमान झाला आहे. १७ दिवस मोठा उत्साह या ठिकाणी असणार आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीची मुर्ती ही खास आकर्षण ठरत आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून इंदिरा गांधी व्यापारी संकुलात ११ दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. नगरपरिषद व व्यापारी वर्ग हा उत्सव साजरा करतात. यंदा मंडळाने श्री महालक्ष्मीचा देखावा सादर केला आहे. देव नरसोबा मंदीर जुना बाजार येथे १७ दिवसांच्या गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. पालखीतून निघणारी विसर्जन मिरवणूक या मंडळाच आकर्षण असते. उभाबाजार मारूती मंदिर येथे २१ दिवसांच्या गणरायाची भक्तिभावाने सेवा केली जाते. विविध कार्यक्रमांची रेलचेल, धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात. तसेच वैश्यवाडा येथील हनुमान मंदिरात २१ दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. संकष्टीला सहस्र मोदकांचा नैवेद्य गणराला दाखवला जातो. चितार आळी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून ११ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
विविध सामाजिक उपक्रम हे मंडळ राबविते. चलचित्र देखावा या मंडळाचे खास आकर्षण ठरते. यंदा या गणराया समोर