अवजड वाहनांना बंदी

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 05, 2024 15:12 PM
views 67  views

सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सव कालावधीत अवजड वाहनांमुळे इतर वाहतुकीला अडचण येऊ नये यासाठी ५ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर, ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर, १७ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र यातून गॅस सिलेंडर, दूध वाहतूक, भाजीपाला, औषधे, जीवनावश्यक वस्तू वाहतुकीला वगळण्यात आले आहे.