विजेच्या सतत जाण्याने गणेश मूर्तिकाराना त्रास | अन्यथा भाजप युवा मोर्चा तर्फे घेराव: नारायण कुंभार

Edited by: दीपेश परब
Published on: August 22, 2022 17:26 PM
views 136  views

वेंगुर्ला: गणेशोत्सव अवघ्या ८ दिवसांवर आला असून गणेश मूर्तीकारांची लगभग वाढली आहे. गणेश मूर्ती वरील अंतिम रंगकाम सुरू आहे. सध्या वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने याचा मोठा त्रास या मुर्तीकारांना होत आहे. यामुळे पुढील ८ दिवसात वीज वितरणने योग्य ते नियोजन करून वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा भाजप युवा मोर्चाच्या वतीने वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल असा इशारा भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीस नारायण कुंभार यांनी दिला आहे. 

   सध्या गणेशमूर्तींना रंगकाम सूरु असल्याने यासाठी लाईटची अत्यंत गरज असते. मात्र सध्या वारंवार विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याचा मोठा त्रास या गणेश मुर्तीकाराना होत आहे. यामुळे याकडे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन नियमित वीज पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी नारायण कुंभार यांनी केली आहे.