करुळ येथे उद्या गणेश जयंती उत्सव | राज्यस्तरीय ढोलवादन स्पर्धेचे आयोजन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 12, 2024 07:44 AM
views 66  views

वैभववाडी : रामेश्वर युवा मित्र मंडळ करुळ भोयडेवाडी यांच्यावतीने येथील गणेश मंदिर गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गेली तीस वर्षे या मंडळाच्यावतीने माघी गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो.याहीवर्षी यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.गणेश जयंती दिवशी सकाळी ६वा अभिषेक,८वा आरती,९वा.पालखी मिरवणूक,९.३०वा सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३०ते३महाप्रसाद, दुपारी ३.३०ते रात्री ८पर्यंत सुस्वर भजने, रात्री ८.३०ते९महाआरती,रात्रौ९.३०राज्यस्तरीय ढोलवादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या कार्यक्रमांला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले.