गणेश मूर्ती बनविण्याच्या स्पर्धेचं आयोजन...!

Edited by: विनायक गावस
Published on: February 02, 2024 12:23 PM
views 167  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघ व देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईन चित्रकला महाविद्यालय देवरुख, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात गणेश मूर्ती प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा व बक्षिस वितरण समारंभ २०२४ आयोजन करण्यात आलं आहे.

३ फेबुवारी ते ४ फेबुवारी २०२४ या वेळेत सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० वा. काझी शहाबुद्दीन हॉल, प्रांताधिकारी कार्यालयासमोर याच आयोजन करण्यात आलं आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याच आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघ व देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईन चित्रकला महाविद्यालय देवरुख यांनी केल आहे.