'सिंधुरत्न'मधून गणेश मूर्तीकारांना साहित्य मिळावं

गणेश मुर्तीकार संघाने वेधलं लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: April 16, 2025 16:41 PM
views 240  views

सावंतवाडी : अनुदान तत्त्वांवर 'सिंधुरत्न' योजनेतून गणेश मूर्तीकारांना साहित्याचा लाभ मिळावी अशी मागणी गणेश मुर्तीकार संघाच्यावतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मातीच्या गणेशमूर्ती बनविल्या जातात. सरकारमार्फत गणेश मूर्तीकारांसाठी सिधुरत्न योजनेतून काँप्रेसर व माती मळण्याची मशीन ७५ टक्के अनुदानावर देणे तत्वावर योजना जाहिर केली. त्यानुसार प्रत्येक मूर्तीकारांनी ग्रामपंचायतीद्वारे अर्ज दाखल केले. ग्रामपंचातीने सदर अर्ज पंचायत समितीकडे पाठविले. त्यानुसार गेल्या महात त्यांना लाभमिळाला त्यांची नावे जाहिर झाली जी नावे जाहिर झाली त्यात काही गावे अशी आहेत की तेथील कोणाही मूर्तीकाराला लाभ मिळालेला नाही. ज्याची मूर्तीकार शाळाच अशांची नावे जाहिर झाली पण खरोखरच ज्याची पारंपारिक गणेश मूर्तीची शाळा आहे अशा बऱ्याच मूर्तीकारांना हा लाभ मिळाला नाही. प्रथमच शाळेत दोन काम करीत असले तर त्या दोघांनाही याचा लाभ मिळाला आहे. बच्चात्र मूर्तीकारांनी श्री गणेश मूर्तीकार संघटनेकडे विचारणा केली, संघटनेने याचा गांभिर्याने विचार करून यादी पाहिली असता संबंधित बऱ्याच मूर्तीकारांची संघटनेकडे नोंद नाही. संघटनेकडे असलेल्या मूतीकारांची नोंद पाहिली असता कितीतरी पटीने जास्त नावे या यादीत आहेत याची माहिती घेतल्यावर असे लक्षात आले की जे मूर्तीकार आहेत त्यांच्याकडे कामाला असतेते त्यांची पण नावे या यादीत आहेत. ग्रामपंचायतीने सदर अर्ज पुढे पाठविताना मूर्तीकारांची शाळा आहे की नाही याची खात्री केली नसावी. त्यामुळे खरोखरच मूर्तीकार आहेत ते या योजनेपासून वंचीश राहिले आहेत. जे मूर्तीकार नाहीत त्यांची नावे वगळण्यात यावीत.

चांदा ते बांदा या योजनेत मूर्तीकार संघटनेने एक प्रस्ताव तयार केला होता व अनुदान तत्वावर मशिनरी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. प्रस्ताव दिला होता पण ती योजना बंद होऊन त्याऐवजी सिंधुरत्न योजना आाली. श्री गणेश मूर्तीकार संघ ही संघटना कार्यरत आहे. पण या योजनेसाठी संघटनेला कुठेही विश्वासात घेतले नाही कृपया खऱ्या मूर्तीकारांना अनुदानाचा लाभ मिळावा अशी अपेक्षा आहे असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी मुर्तीकार संघाचे अध्यक्ष नारायण सावंत, राधाकृष्ण नाईक, उदय राऊत, अजय परब, दीपक जोशी, दीपक गोवेकर, अरूण पालकर आदी मुर्तींकार संघाचे सदस्य उपस्थित होते.