गणेशोत्सवाच असं आहे देवगड न. पं. चं नियोजन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 05, 2023 21:30 PM
views 87  views

देवगड : गणेश चतुर्थी काळात शहरातील  नागरिकांना पाणीटंचाईपासून मुक्तता मिळावी, यासाठी गौरी गणपती सणाच्या अनुषंगाने गणेशोत्सव काळात देवगड- जामसंडे नगरपंचायत हद्दीत योग्य ते नियोजन करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन देवगड जामसंडे नगरपंचायतच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली देवगड नगर पंचायत कार्यालयात करण्यात आले होते . या प्रसंगी उपनगराध्यक्ष मिताली सावंत, मुख्याधिकारी सुरज कांबळे, पाणी पुरवठा सभापती संतोष तारी, आरोग्य शिक्षण सभापती विशाल मांजरेकर, अन्य सर्व नगरसेवक नगरसेविका त्याचप्रमाणे व्यापारी संघ अध्यक्ष शैलेश कदम ,राजू पाटील ,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता संदीप पवार ,श्री. सूर्यवंशी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या सहाय्यक अभियंता शिल्पा माने ,उपस्थित होते.

या नियोजनाच्या निमित्ताने देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील १७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक कर्मचारी नियुक्त करून घंटागाडीमार्फत सर्व प्रभागातील घानकचरा संकलन करण्याचे काम केले जाते.या प्रभागातील रस्त्याच्या दुतर्फे असलेले गवत सफाईचे काम पंधरा सप्टेंबर पूर्वी पूर्ण करण्यात येईल विशेषतः शहरातील साफसफाई बाबत विशेष दक्षता घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये देवगड जामसंडे या मुख्य दोन बाजारपेठा असून, त्या ठिकाणी वाहनांची कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी बाजारपेठ नगरपंचायत मार्फत वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने जामसंडे वाडातर रस्ता, देवगड कॉलेज नाका ,देवगड बालोद्यान तहसील कार्यालय, नजीक पार्किंग व्यवस्थेबाबत या बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली. देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत कार्यक्षेत्रात एकूण १८ गणेश विसर्जन घाट असून प्रत्येक घाटाची साफसफाई करण्यात आली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

गणेश घाटावर पोचणाऱ्या रस्ता पायवाट यांची साफसफाई करून घेण्यात आली असून गणेश विसर्जन प्रत्येक घाटावर एक कर्मचारी नियुक्त करून निर्माल्य कलश निर्माण करण्यात यावे त्याप्रमाणे धोक्याच्या ठिकाणी समुद्रकिनारा खाडीकिनारी गणेश घाटावर सुरक्षारक्षकाची नियुक्ती करण्यात यावी,अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. प्रामुख्याने गणेश घाट जामसांडे पिरवाडी, तरवाडी कावलेवाडी ,वेळवाडी ,खाक्षी, वळकुवाडी ,पाटकरवाडी, बेलवाडी ,भटवाडी, देवगड आनंदवाडी ,किल्ला, अमरवाडी ,विठ्ठलवाडी, देवगड भाटी ,देवगड बीच ,देवगड तारा मुंबरी या ठिकाणी गणेश विसर्जन घाट असल्याचे या बैठकीत सुचित करण्यात आले. देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रात सार्वजनिक गणेश मंडळ गणेशोत्सव साजरा केला जात नाही. या गणेशोत्सव काळात देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व बंदावस्थेत असलेले लाईट ,स्ट्रीट लाईट सुरु करण्यात यावेत .अशी सूचना करण्यात आली. त्याचबरोबर म.रा. वि.. वि. कंपनीमार्फत आवश्यक तो विद्युत पुरवठा गणेशोत्सव काळात सुरळीत ठेवण्यात येईल .अशा प्रकारची माहिती सहाय्यक अभियंता शिल्पा माने यांनी बैठकीत दिली.

नगरपंचायत कार्यक्षेत्रात ना दुरुस्त असलेल्या पाणी पुरवठा लाईन दुरुस्त करून घेण्यात येऊन गणेशोत्सव काळात किमान दोन दिवस आड पाणीपुरवठा देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना करण्यात यावा अन्यथा यात काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्यासाठी विशेष टँकर व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी ही उपस्थित नगरसेवकांमार्फत करण्यात आली. त्याचबरोबर देवगड जामसंडे कार्यक्षेत्रातील रस्त्यांची पाहणी करून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याकरता निविदा प्रक्रिया करण्यात आली. असून त्यानुसार गणेश उत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे तशी सूचना करण्यात येऊन यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी माहिती नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी या बैठकीत दिली. विशेषतः आठवडा बाजारात एक दिशा मार्ग निर्माण करण्यात यावा व त्याचे पालन नगरपंचायत प्रशासनापासून सर्व नागरिकांकडून करण्यात यावे जेणेकरून कोणत्या प्रकारचे वाद निर्माण होणार नाही. अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. त्याचबरोबर देवगड येथील आठवड्या बाजार हा गोडाऊनपासून खालील भागात भरविण्यात यावा व उर्वरित गोडाऊन पुढील मार्ग हा पूर्णतः मोकळा ठेवण्यात यावा.असे या बैठकीत सूचित करण्यात आले.

प्रामुख्याने संपूर्ण देवगड एसटी स्टँड ते जामसंडे बाजारपेठे पर्यंत रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात दुचाकी चार चाकी वाहने लावली जातात, त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यावर योग्य ते नियंत्रण करण्यात यावे पार्किंगची व्यवस्था ही योग्य प्रकारे करण्यात यावी व रस्त्यात वाहतुकीला कोणत्याही प्रकारची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे या बैठकीत सुचित करण्यात आले. या चर्चेत प्रामुख्याने नगरसेविका तन्वी चांदोस्कर ,प्रणाली माने, नगरसेवक नितीन बांदेकर बुवा तारी,संतोष तारी, रवींद्र चिंदरकर शरद ठुकरुल या नगरसेवकांनीही सहभाग घेतला होता.