
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान-5 व स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही 2 कृत्रिम तलावांची व्यवस्था शहरात सर्वोदय नगर , लक्ष्मी नगर (जूस्तीन नगर) जवळ केली आहे. निसर्गापासून तयार केलेल्या वस्तु पर्यावरणाला हानी न पोहोचता निसर्गामद्धे पुनः समर्पित व्हाव्यात हा यामागचा उद्देश आहे. या कृत्रिम तलावात सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आपल्या गणरायाचे विसर्जन केले. सावंतवाडी नगरपरिषदेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केल. या वेळी त्यांच्यासोबत सर्व कुटुंबीय उपस्थित होते. पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन करून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावला. याशिवाय सर्वांसमोर स्वतः चा एक आदर्श घालून दिला आहे.तसेच माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्यास सहकार्य केले आहे.