सिंधुदुर्गात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी 'अल्प दरात बस सेवा'

अर्चना घारेंचा उपक्रम
Edited by: विनायक गांवस
Published on: August 12, 2024 07:24 AM
views 249  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या सौजन्याने सालाबादप्रमाणे यंदाही सिंधुदुर्गवासियांसाठी ''अल्प दरात बस सेवा'' उपलब्ध करून देण्यात आली आहे.सिंधुदुर्ग युवा ग्रुप, पिंपरी चिंचवड यांच्याद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे येथून सुटणारी बस सावंतवाडी, वेंगुर्ला / दोडामार्ग तालुक्यापर्यंत येणार आहेत. गणेशोत्सवात सिंधुदुर्गात जाणाऱ्या जनतेची  होणारी गैरसोय लक्षात घेऊन दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाही खास गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या समस्त सिंधुदुर्गवासीयांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अर्चना घारे-परब यांनी केले आहे.


गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या कोकणवासीय गणेशभक्तांची प्रवासादरम्यान होणारी गैरसोय, वाढलेले तिकीट दर यामुळे पडणारा भुर्दंड आदी लक्षात घेऊन अर्चना घारे-परब कोकणातील लोकांसाठी लक्झरी बस उपलब्ध करून देतात. दरवर्षी गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सौ.घारे यांचा पुढाकार असतो. सिंधुदुर्ग युवा ग्रुप, पिंपरी चिंचवड यांच्याद्वारे अल्प दर आकारून हा उपक्रम राबविण्यात येतो.सालाबादप्रमाणे यंदाही 4 व 6 सप्टेंबर 2024 रोजी पिंपरी-चिंचवड येथून या गाड्या सुटणार आहेत. पिंपरी चिंचवड - नवले पूल, पुणे-कोल्हापूर - गगनबावडा- कुडाळ - सावंतवाडी- वेंगुर्ला / दोडामार्ग असा प्रवास मार्ग असणार आहे. खास गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या समस्त सिंधुदुर्गवासीयांना ही अल्प दरात ( तिकीट दर-रु. 750/- प्रती प्रवासी.) बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर शेजारी, लांडेवाडी चौक, भोसरी, पुणे. येथून संध्या. 6.00 वा. बस सुटणार असून या उपक्रमाचा समस्त सिंधुदुर्गवासीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन अर्चना घारे-परब यांनी केले आहे.