
मुंबई : मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर आज सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन व कोकण विकास समिती यांच्या वतीने डोंबिवली पूर्व येथे डोंबिवली जिमखाना येथे खुल्या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती मुंबई गोवा महामार्गाच्या दिरंगाईच्या अनुषंगाने या खुल्या त्याच्या सत्राचे आयोजन कोकण विकास समिती यांच्यावतीने करण्यात आले होते.
यावेळी यावेळी सामाजिक संस्था, पत्रकार, अन्याय झालेले शेतकरी व समस्त कोकणवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे तीन तास चाललेल्या या खुल्या चर्चा सत्रात उपस्थित त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न संदर्भात आपले प्रश्न उपस्थित केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे या विभागाची जबाबदारी आल्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे.
गेली बारा वर्षे विविध कारणांमुळे या महामार्गाचे काम रखडलेले असल्यामुळे हजारो प्रवाशांचे व नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी कोकण वासियांसाठी व मुंबईकरांच्या चाकरमानांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेल्या मुंबई गोवा महामार्ग संदर्भात व्यक्तिशः लक्ष घातले त्याबद्दल उपस्थित जनसमुदायाने मंत्री रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले व आभार मानले.
मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कामही बऱ्यापैकी पूर्ण होत आहे मूळ जो प्रश्न आहे तो पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या दरम्यानच्या 84 किलोमीटर अंतराचा या दोन्ही टप्प्यातील काम पूर्ण क्षमतेने व अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने युद्धपातळीवर सुरू आहे. गणपती पूर्वी या महामार्गावरील सिंगल लेन सुरू करणार असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
मी सुद्धा कोकणचा सुपुत्र आहे व मुख्यमंत्री देवे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला या विभागाची जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे ही कोकणवासी जबाबदारी मी पूर्ण करून कोकणवासीयांना न्याय मिळवून देणार मुंबई गोवा महामार्गावरील अपूर्ण असलेले काम लवकरच पूर्ण होईल असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण व्हायला हवे ही सर्वांचीच जबाबदारी आहे सरकार म्हणून आणि मंत्री म्हणून ही मी जबाबदारी स्वीकारलेली आहे या महामार्गाच्या कामापुढील जी आव्हाने व अडचणी उभ्या राहिल्या आहेत त्या सोडवण्याचे काम मी करत आहे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्याची खूणगाठ मी माझ्या मनात बांधलेली आहे एक कोकणचा सुपुत्र म्हणून कोकणवासी यांचे कर्ज फेडण्याचे काम मी करत आहे असे भावनिक उदगारही मंत्री चव्हाण यांनी यावेळी काढले.
ही लढाई म्हणजे श्रेयाची नसून कोकण वासियांच्या हक्काची व न्यायाची लढाई आहे त्यामुळे ही लढाई मी यशस्वीरित्या पूर्ण करणार व कोकणवासीयांना न्याय मिळवून देणार असा विश्वास व्यक्त करतानाच मंत्री चव्हाण म्हणाले की हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने सकारात्मक रित्या विचार केला पाहिजे जेवढे आपण सकारात्मक राहू तेवढेच हे काम लवकर पूर्ण होईल नकारात्मक दृष्टिकोन हा बदलला पाहिजे मी हरलो तर कोकण ठरेल असे मला वाटते त्यामुळे या महामार्गाच्या कामाला मी नक्कीच न्याय मिळवून देईल असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
याप्रसंगी या खुल्या चर्चा सत्राचे मुख्य संयोजक काका कदम यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले याप्रसंगी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर एडवोकेट ओवेस पेशकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी व्यासपीठावर भाजपचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रत्नागिरीचे भाजपचे पदाधिकारी केदार साठे माजी आमदार धैर्यशील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते