
मंडणगड : पाच दिवसांचे गणपतीसोबत गौराईंचे तालुक्यातील ठिकठीकाणी शांततेत विसर्जन करण्यात आले. 12 सप्टेंबर 2024 रोजी बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे हद्दीत 2 सार्वजनिक व 250 खाजगी गणेश मुर्ती व गौराईंचे विसर्जन करण्यात आले तर मंडणगड पोलीस स्थानकाचे हद्दीत हद्दीतील 3 सार्वजनिक व 1860 खाजगी गणेश मुर्ती व गौराईंचे विसर्जन करण्यात आले. तालुक्यातील सावित्री भारजा,निवळी या नद्यासह अनेक गावात तळी वहिर व लहान ओढ्यामध्ये विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाचे पहील्या पाच दिवसांचे कालवधीत तालुक्यातील वातावरण भक्तीमय झालेले दिसून आले पाच दिवसांचे गणेशोत्सवाकरिता तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाकरमनी गणेशभक्तही दाखल झाले असून जागोजागीच्या विसर्जन मिरवणुकांनतर त्यांच्या परतीच्या प्रवासाची लगबगही सुरु झाली. परतीच्या प्रवासाकरिता मंडणगड आगाराने यंदा मुंबई व उपनगरांचे मार्गावर 126 जादा गाड्या सोडल्या आहेत चाकरमनी गणेशभक्त खाजगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. गणेशोत्सवाचे कालवधीत सणाचे कार्यक्रम शांततेत संपन्न व्हावेत याकरिता पोलीस निरिक्षक नितीन गवारे, पोलीस निरिक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होमगार्ड तालुका समादेशक प्रदीप मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहरक्षक दलाचे तालुक्यातील सर्व जवानानीही आपले कर्तव्य उत्तमपणे बजावले. मंडणगड शहर परिसरात निवळी नदी व भिंगळोली येथील तळ्यात गणेशभक्तांनी सायकांळी उशीरा विसर्जनास सुरुवात केली पावसाने उसंत घेतल्याने विसर्जन मिरवणुकीची रंगत वाढली. गणेशभक्तांनी वाजत गाजत मिरवणुक काढून बप्पांना पुढच्या वर्षी लवकर येण्याचा आग्रह धऱत निरोप दिला.