व्हिडिओ गेम पार्लरवर धाड टाकत पोलिसांची कारवाई

Edited by: भरत केसरकर
Published on: March 15, 2023 09:17 AM
views 279  views

कुडाळ : कुडाळात आज संध्याकाळी पोलीसांनी आक्रमक भूमिका घेत कुडाळातील व्हिडीओ गेम पार्लरवर अचानक धाड टाकीत कारवाई केली आहे. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेने कुडाळ व पिंगुळीत अनधिकृत व्हिडिओ गेम पार्लर चालवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की कुडाळ शहरात आणि पिंगूळी परिसरात अनधिकृतपणे चार ते पाच व्हिडिओ गेम पार्लर चालवले जातात. याबाबतची माहिती कुडाळ पोलिसांना मिळतातच कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एसटी स्टँड परिसरातील एका व्हिडिओ गेम पार्लरवर आज संध्याकाळी कुडाळ पोलीस निरीक्षक श्री.चिंदरकर यांनी अचानक धाड टाकीत कारवाई केली. या धाडीत अनधिकृतपणे व्हिडीओ गेम पार्लर चालवणारांचे धाबे दणाणले आणि धावपळ सुरू झाली. अचानक पडलेल्या धाडीने अनधिकृतपणे व्हिडीओ पार्लरवर मालकाचे व पार्टनरचे चांगले धाबे दणाणले. याबाबतची सखोल चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. कुडाळ शहरात दोन ते तीन तर पिंगुळीत दोन व्हिडिओ गेम पार्लर चालवले जातात.अनधिकृत पणे व्हिडिओ गेम पार्लर चालवले जातात याची अधिकृत माहिती मिळताच पोलिसांनी अचानकपणे ही कारवाई सुरू केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व पिंगुळी परिसरातील हे व्हिडिओ गेम पार्लर स्थानिकांच्या नावे आहेत. परंतु कोल्हापूर मधील काहीजण हे व्हिडिओ गेम पार्लर अनधिकृपणे चालवत आहेत यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सातत्याने होत होती. पण पोलिस दुर्लक्ष करीत होते. स्थानिकांना पाठीशी घालून कोल्हापुरातील धनदांडगे व्हिडिओ गेम पार्लर चालवत होते. या कारवाईने अचानक भंबेरी उडाली आहे. पोलीस स्टेशनला याबाबत विचारणा केली असता अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. दरम्यान या कारवाईचे सामान्य नागरिक कौतुक होत आहे.