गजेंद्र कोठावळे यांना 'महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार' जाहीर

Edited by: विनायक गावस
Published on: June 05, 2023 17:03 PM
views 95  views

सावंतवाडी : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा लातुर यांच्या वतिने दिला जाणारा कलाभूषण पुरस्कार गजेंद्र कोठावळे यांना जाहीर झाला आहे. इन्सुली गावातील बिलेवाडी सारख्या वाडीमध्ये राहणारे गजेंद्र कोठावळे यांना यापूर्वी आर्ट बिट्स फाउडेशन पुणे यांच्या वतिने कला सन्मान, बुलढाणा फिल्म सोसायटीच्या वतिने राष्ट्रिय कलागौरव, महाराष्ट्र चित्रपट सेनेच्या वतिने सिने स्टार, महाराष्ट्र राष्ट्रिय प्रतिष्ठा पुरस्कार असे 2023 मध्ये चार पुरस्कार जाहीर झाले होते.  महाराष्ट्र कलाभूषण 2023 हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.