
सावंतवाडी : मळेवाड येथील रविवार ३ मार्च रोजी श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार सकाळी ६.३० ते ९ वाजता पाद्यपूजा व पंचामृत महाअभिषेक,महापूजा,सकाळी ९.३० ते १२ वाजता आदित्य ह्रदयानुष्ठान धार्मिक कार्यक्रम, दुपारी १२.३० ते १.वाजता महाराजांची महाआरती ( प्रकट समय ),दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद,दुपारी २.३० ते ६ वाजता श्री माऊली एकता कला क्रिडा संस्था गावठणवाडा,मोपा ( गोवा ) पुरस्कृत “ ओठी नाम स्वामींचे “ हा भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम, संध्याकाळी ७ वाजता पालखी प्रदक्षिणा,रात्री ८.३० वाजता महाआरती, रात्री १० वाजता श्री मुसळेश्वर नाट्यमंडळ, मळेवाड ( हेदुलवाडी ) यांचा दोन अंकी नाटक “ राखणदार “ हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.