किल्ले विजयदुर्गवरती गडपूजन - दिपोत्सव उत्साहात..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 17, 2023 17:17 PM
views 49  views

देवगड : देवगड विजयदुर्ग किल्ला येथे सालाबाद प्रमाणे गड किल्ले संवर्धन संस्था.महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने मंगळवार १४-११-२०२३ दिवाळी पाडवा या दिवशी किल्ले विजयदुर्ग वरती गडपूजन व दिपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी सोहळ्याने करण्यात आली. लखलखत्या मशालीच्या उजेडात विजयदुर्ग बस डेपो ते भवानी माता मंदीरा पर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुक काढण्यात आली.

पालखीचे आगमन महादरवाज्या होताच महादरवाज्यात १०० पणत्या तसेच ५१ मशाली प्रज्वलित करून रोषणाई करण्यात आली. यावेळी उपस्थित विजयदुर्ग ग्रामस्थाच्या हस्ते किल्ल्याच्या महादरवाचे पूजन करून गड पुजन करण्यात आले. किल्ल्यात असलेल्या आदिशक्ती श्री भवानी मातेच्या मंदीर फुलांनी रंगेबी रंगी फुलांनी सजवण्यात आले.

तसेच किल्ल्या वरील इतर देव देवतांच्या चरणी दिवे लावण्यात आले या प्रसंगी ग्राम विकास मंडळ विजयदुर्ग सल्लागार राजेंद्र परुळेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुर्तीचे पुजन करून ध्येयमंत्र ,प्रेरणा मंत्र आरती व शिववंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन कोकण विभाग अध्यक्ष- शुभम रानम, उपाध्यक्ष – राजेश काळे ऊस्तव प्रमुख – गुरुनाथ काळे ,राकेश फाटक संपर्क प्रमुख – शुभम फाटक अभिजित तिरलोटकर विकास तोरसकर यांनी केले.

या कार्यक्रमामध्ये – प्रतिक गमरे,सागर कोकाटे,अक्षय येरम,मनोज मेस्त्री,विनोद कूडकर,सुप्रिता नर,रेणुका गुरव,प्रियंका झोर,तनुजा हातगे,क्रांती तिरलोटकर,सानिका रानम,प्रशांत गुरव,चेतन गुरव,अनुरुद्ध तिरलोतकर, समीर गुरव,नितीन नारकर,सागर अनभवणे, अनिकेत तोरसकर,जयेश तांबे,प्रथमेश तांबे,रोहित गुरव,दुर्गेश गुरव,अभिषेक गुरव, अजय काळे, अतुल काळे, सर्वेश कोकरे, विनायक टक्के,सूरज रानम,किशोर ठूकरूल, राहुल तावडे या उत्सवास संस्थेचे युवक व युवती मिळून जवळपास १५० शिवभक्त उपस्थितीत होते.या कार्यक्रमाला पुरात्वव विभाग चे कर्मचारी श्री यशपाल जैतापकर तसेच स्थानिक ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले.