सावंतवाडीत गडकरी तर कणकवलीत राज ठाकरेंची सभा

Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2024 08:18 AM
views 337  views

सावंतवाडी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ भाजपचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ५ मे रोजी सावंतवाडी येथे जाहीर सभा संपन्न होणार आहे. तर ४ मे रोजी कणकवली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा राणेंच्या प्रचारार्थ होणार आहे. अशी  माहिती माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडीत दिली. तर मतदारसंघातील सहाही विधनासभा मतदारसंघात आमची ताकद आहे. त्यामुळे आमच धैय्य राणेंना जास्तीत जास्त लीड देण्याच आहे असं मत राजन तेली यांनी सावंतवाडीतील आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.