असा आहे गाबीत समाज शिमगोत्सव देवगड तालुका दौरा !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 27, 2024 10:42 AM
views 136  views

देवगड : अखिल भारतीय गाबीत समाज संस्था,गाबीत समाज, महाराष्ट्र , गाबीत समाज सिंधुदुर्ग आणि गाबीत समाज देवगड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यामध्ये संपन्न होणाऱ्या पारंपारिक”गाबीत शिमगोत्सवाची”माहिती घेणे तसेच त्यानिमित्त गावकरी आणि चाकरमानी मंडळी यांचेशी सुसंवाद साधण्यासाठी येत्या बुधवार दिनांक २७ व गुरुवार दिनांक २८ मार्च २०२४ रोजी खालील प्रमाणे गांववार देवगड तालुका दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी त्यावेळी सर्वांनी गाठीभेटी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाजाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर, महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धूरत, बाळा मणचेकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर व देवगड तालुकाध्यक्ष संजय पराडकर यांनी केले आहे.

तसेच येत्या मे २०२४ मध्ये देवगड येथे “गाबीत महोत्सवाचे”आयोजन करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी रविवार दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी देवगड तालुक्यातील गाबीत समाज कार्यकर्त्यांची विस्तृत बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

देवगड दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे 

दिनांक : २७ मार्च २०२४

देवगड – आडबंदर – सकाळी ११.००

मोर्वे – १२.००

तांबळडेग-१२.३०

कुणकेश्वर मार्गे मिठमुंबरी

बागवाडी – १.३० तारामुंबरी – २.००

देवगड २.३० जेवण

देवगड किल्ला ३.००

आनंदवाडी – ३.३०

मळई – ४.००

वाडातर बीच समोर तरवाडी/पिरवाडी – ४.३०

कालवी – ५.00

कट्टा – ६.00

टेंबवली – ६.३०

तळवडे -७.०

दिनांक: २८ मार्च

देवगड – वाडातर १०.००

विरवाडी – ११.०० विजयदुर्ग

गिर्ये – बांदा – १.३०

पडेल कॅन्टीन जेवण

आंबेरी – ३.०० मोंड – चिंचवाडी -४.००

मोंड गांव – ४.३०

बापर्डे मार्गे वानिवडे – ६.००

तळेबाजार – जामसांडे – तुळशीनगर – देवगड – ७.००