
बांदा : आपले संपूर्ण आयुष्य संगीत सेवेसाठी खर्च केलेले व गोवा तसेच सिंधुदुर्गात संगीत शिक्षण कलेचे निरपेक्ष भावनेतून दान करून कित्येक विद्यार्थी घडवलेले श्री बांदेश्वर संगीत कलावर्गाचे संस्थापक गुरुवर्य दिगंबर उर्फ बाळू गाड यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या शि ष्यवर्गाच्या वतीने बांदा येथे बांदा विविध कार्यकारी सोसायटी च्या अळवणी सभागृहात शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव बांदेश्वर संगीत कला वर्गाच्या वतीने करण्यात आले आहे.