म्हापण जि.प.मतदार संघात दीपक केसरकरांच्या माध्यमातून १ कोटींचा निधी

विविध रस्त्यांचे करण्यात आले भूमिपूजन
Edited by: दिपेश परब
Published on: December 16, 2023 10:40 AM
views 130  views

वेंगुर्ला : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून राज्यशासनाच्या मार्च २०२३ अर्थसंकल्पीय निधी अंतर्गत म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील सुमारे १ कोटी ३ लाख ४० हजारांच्या विविध रस्त्यांच्या मंजूर विकासकामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या व जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.


शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून कोचरा चव्हाटावाडी ते राऊळवाडी आगारवाडी रस्ता ग्रामीण मार्गामध्ये सुधारणा व डांबरीकरण या कामाला सुमारे २० लाख, कोरजाई आनंदवाडी कर्ली रस्त्यामध्ये सुधारणा व डांबरीकरण या कामासाठी सुमारे २० लाख ११ हजार, परुळे भगवती मंदिर ते मेरवाचे पाणी रस्त्यामध्ये सुधारणा व डांबरीकरणासाठी सुमारे १६ लाख ७८ हजार, मालवण देवली, तारकर्ली, परुळे रस्ता मजबुतीकरणासह रुंदीकरण या कामाला सुमारे २१ लाख ५० हजार, कोचरा चव्हाटा ते उंबराचे पाणी रस्त्यामध्ये सुधारणा व डांबरीकरण कामासाठी सुमारे २५ लाख असा मिळून म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील या विकासकामांसाठी एकूण १ कोटी ३ लाख ४० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी रुपेश पावसकर, महिला जिल्हाप्रमुख नीता सावंत कविटकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, विधानसभा प्रमुख प्रेमानानंद देसाई, राजन रेडकर, कोचरा सरपंच योगेश तेली, माजी उपसरपंच देवदत्त साळगावकर, रोहित म्हापणकर, चिपी माजी सरपंच गणेश तारी, सोसायटी चेअरमन ब्रिजेश तायशेटये, ग्रामपंचायत सदस्य अनिल सुतार, संजय गोसावी, प्रगती राऊळ, विशाल वेंगुर्लेकर, सौ. परब,अभय परूळेकर, सुनाद राऊळ, निलेश बावकर, ऊमेश नेवाळकर, विष्णू माधव, अविनाश देसाई, अमेय देसाई, नंदु प्रभु, मुकेश करलकर, रवी आजगावकर, कृष्णा हंजणकर, बाबा शिरोडकर, नीळकंठ शिरोडकर,  हेमंत मिठबावकर, श्री. बोवलेक आदी उपस्थित होते.