
कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली शहरासाठी 2025 - 26 या वर्षामध्ये तब्बल दहा कोटी 65 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून कणकवली शहरात 36 विकासकामे होणार असून या कामांनाही मंजुरी मिळाली आहे. पावसाळ्यानंतर या विकासकामांना प्रारंभ होईल, अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. यावेळी उपस्थित माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सदर निधीतून होणार असणाऱ्या कामांची माहिती दिली.
येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. नलावडे व श्री. हर्णे बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक बंडू गांगण आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन मधून पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर केलेल्या निधीतून होणाऱ्या विकास कामांची माहिती देताना बंडू हर्णे म्हणाले, टेंबवाडी (हिंद छात्रालय) ते रवळनाथ मंदिर ते सुतारवाडी या 12 मीटर डी.पी. रस्त्याकरीता जमिनीचे उर्वरीत क्षेत्र भू-संपादन, कणकवली नगरपंचायत हद्दीतील निम्मेवाडी बाईत घर रस्ता डांबरीकरण करणे. नरडवे रोड मोहन माळ येथील वहाळाशेजारी संरक्षक भिंत, टेंबवाडी येथील नविन रस्त्याला सोलार पथदिप व्यवस्था, बिजलीनगर येथील हिर्लेकर सर्व्हिसिंग सेंटर नजीक गटर बांधकाम, हर्णेआळी येथील हेमंत उपरकर चाळ ते आरोलकर कंपाऊंपर्यंत गटर बांधकाम, कणकवली नगरपंचायत हद्दीतील विविध ठिकाणी सोलार हायमास्ट बसविणे.रिंगरोड फेज 1 व 2 येथे सोलार पथदिप व्यवस्था करणे, परबवाडी येथील संतोष पवार घर ते जुन्या नरडवे रस्त्यापर्यंत फुटपाथ व गटर बांधकाम करणे, परबवाडी रस्ता नुतनीकरण करणे, एस.टी. वर्कशॉप रस्ता नुतनीकरण करणे, मराठा मंडळ येथे गणेशघाट बांधणे, कॉम्प्लेक्स शेजारील गटर बांधकाम, परबवाडी येथील गणपती सान्याचे उर्वरीत बांधकाम व रस्ता बांधकाम, बाजारपेठ स्मशानभूमीचे नुतनीकरण, गणपती साना रस्ता येथील कांदळकर घर ते कला महाविद्यालयापर्यंत दोन्ही बाजूने गटर बांधकाम, तेलीआळी येथील कस्टम ऑफिस शेजारील गटर बांधकाम, तेलीआळी रस्ता रूंदीकरण व मजबुतीकरण, बाजारपेठेतील हरिश्चंद्र हॉटेल ते लाड घर गटर बांधकाम, आप्पासाहेब पटवर्धन चौक (आचरा रोड) ते मसुरकर किनई रोडपर्यंत रस्ता नुतनीकरण, महापुरूष मंदिरामागील बाजूचे गटार बांधकाम, कनकनगर येथील सावंत घर ते शिखरे घर गटर बांधकाम, जळकेवाडी स्मशानभूमी येथे संरक्षक भिंत व शेडचे बांधकाम, टेंबवाडी येथे रस्ता गटर बांधणे, कणकवली नगरपंचायत सभागृह व परिसर नूतनीकरण, कनकनगर येथील ब्राह्मणदेव स्थानाशेजारील पाईप गटर बांधकाम, तेलीआळी ते सह्याद्री हॉटेल रस्ता नुतनीकरण, मुरकर घर ते शाळा नं.5 रस्ता नुतनीकरण, निम्मेवाडी येथील दुखंडे घराशेजारील पाणंद बांधकाम, कणकवली नगरपंचायत आरक्षण क्र.27 व 28 येथील क्रिडा सुविधा केंद्र येथे वुडन कोर्ट करून मॅट बसविणे, मराठा मंडळ येथील उर्वरीत रस्ता नुतनीकरण, बांधकरवाडी येथे पाणंद बांधकाम व रस्ता बांधकाम, सुतारवाडी येथील राणे सृष्टी ते धुरी घर रस्ता, मसुरकर किनई रस्ता मजबुतीकरण, माऊली नदी परिसर सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज चौक पुतळा व परिसर सुशोभीकरण करणे, अशी कामे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या निधीतून करण्यात येणार असल्याचे श्री हर्णे यांनी सांगितले.










