
कुडाळ : गेली कित्येक वर्षे खड्डेमय स्थितीत असलेल्या सिंधुदुर्गनगरी ते वर्दे मुख्य रस्ता प्रजिमा ३७ या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन ५९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून या टप्यात वर्दे कुंभारवाडी, कोकेमळावाडी गावठाणवाडी दरम्यान रस्ता खडीकरण व डांबरीकरण होणार आहे. मागील टप्यात सिंधुदुर्गनगरीला जोडणारा उर्वरित रस्ता पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्यात होणाऱ्या रस्त्यामुळे प्रजिमा ३७ पूर्णपणे खड्डेमुक्त होणार आहे. या संदर्भातील निवेदन वर्दे ग्रामस्थ यांनी भडगाव पूल शुभारंभ प्रसंगी भाजपा नेते श्री. निलेश राणे व पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांना दिले होते. त्यावर तत्काळ अंमलबजावणी करत भाजपा नेते श्री. निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून दिला आहे.
वर्दे गावासाठी पुन्हा नव्याने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वर्दे भाजपा बूथ कमिटी अध्यक्ष श्री. योगेश परब, विभागीय अध्यक्ष श्री. गुंडू सावंत, तुषार सावंत, श्री. सुधीर सावंत, श्री.निलेश सावंत, श्री.चंद्रकांत दळवी, श्री.अरविंद सावंत, श्री.संतोष दळवी, श्री.रमेश परब, श्री. किशोर सावंत, श्री.रवी दळवी, सौ.माधवी दळवी, श्री. प्रदीप हरेर, यांनी पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण, भाजपा नेते श्री निलेश राणे मंडल अध्यक्ष श्री. दादा साईल यांचे आभार व्यक्त केले आहेत.