
सावंतवाडी : जनरल जगन्नाथराव भोसले उद्याना शेजारी नव्यान डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर गुढगाभर पाणी साचल. या पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत नागरिकांना करावी लागते आहे. सैनिक हॉस्टेल समोर सुरुवातीच्या पावसातच गुढगाभर पाणी साचले होते. न.प. बांधकाम विभागाने व कंत्राटदारान गटार व पाण्याला वाट न ठेवल्यान पाणी साचून राहिले. त्यामुळे नव्यानं केलेल्या या रस्त्यावरच डांबर रहात की पाण्यासोबत वाहून जात हे पहावं लागणार आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल येथील नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.