
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या लोकधारेतील फुगडी हा प्रकार अलीकडच्या काळात लुप्त होत चालला आहे. त्यामुळे हा वारसा जपण्याच्या हेतूने आणि रसिकांची करमणूक करण्यास पारंपरिक फुगडी ग्रुप तयार केलेत. फुगड्यांची २०×२० डबलबारी सामने लावत ही लोक संस्कृती जपली जात आहे.
महिलांकडून हे फुगडीचे गृप तयार करण्यात आलेत. गेली अनेक वर्षे गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, जत्रोत्सव तसेच विविध धार्मिक सणांच्या माध्यमातून पारंपरिक फुगड्यांना आधुनिकतेची जोड देऊन अतिशय सुंदर सादरीकरण केलं जातं. यात आता २०×२० डबलबारी सामन्यांचे आयोजन देखील करण्यात येत आहे. भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ व तारादेवी फुगडी मंडळ, वेंगुर्ला यांच्यात हा जंगी सामना रंगला. यामध्ये शिवाजी महाराज यांच्यावर देखील फुगडी गीतातुंन मानवंदना देण्यात आली. नरेंद्र मोदींवर गीत सादर करण्यात आल. कर्जबाजारी शेतकऱ्याची व्यथा मांडत समाज प्रबोधन देखील या निमित्ताने करण्यात आले. दुर्मिळ होत चाललेल्या मुद्यावर या सामन्यातून सादरीकरण केले गेले. भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळच्या निता राऊळ व महिला तसेच तारादेवी फुगडी मंडळ, वेंगुर्लेच्या सपना केळुसकर व महिलांनी उत्कृष्ट असं सादरीकरण केले. तर लखन आडेलकर यांनी या जंगी सामन्याचे निवेदन केलं. सर्वत्र या महिलांचे कौतुक होत आहे