फळपीक विमा नोंदणीची मुदत १५ डिसेंबर पर्यंत वाढली

भाजपा नेते निलेश राणे यांनी केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ मागणी
Edited by:
Published on: December 01, 2023 12:50 PM
views 239  views

कुडाळ : फळपीक विमा नोंदणीची मुदत आज वाढवत राज्य शासनाकडून ३० नोव्हेंबर ऐवजी १५ डिसेंबर करण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजपा नेते निलेश राणे यांची भेट घेत सर्व्हर डाऊन व इतर कारणांमुळे फळपीक विमा भरू शकत नसल्याची माहिती दिली होती. ३० नोव्हेंबर शेवटची तारीख असल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले होते.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालवण येथे आले असता भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांच्याशी चर्चा करत ही मुदत १५ दिवसांनी वाढवून देण्याची मागणी केली होती त्या नुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी सचिवांना तत्काळ निर्देश देत ही मुदत १५ डिसेंबर पर्यंत वाढवून दिली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादन शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही पीक विमा भरलेला नाही त्यांनी तत्काळ पीक विमा भरण्याचे आवाहन भाजपा नेते निलेश राणे यांनी केले आहे. धरणे आंदोलन करण्यात आले.