फळ पीक विमा नुकसान भरपाई वितरण

पालकमंत्री नितेश राणे ऑनलाईन उपस्थित
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 16, 2025 17:00 PM
views 30  views

सिंधुदुर्गनगरी : फळपिक विमा आंबिया बहार सन २०२४-२५ मधील जिल्ह्यातील सर्व पात्र आंबा-काजू बागायतदार यांना विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर प्रत्यक्ष कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, भारतीय कृषी विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक बी. प्रभाकर भारतीय कृषी विमा कंपनी, मुंबई,  अनिल  कुंभारे सहाय्यक महाप्रबंधक भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई हे उपस्थित होते. यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात नुकसान भरपाई धनादेशाचे वितरण करण्यात आले. 

धनादेश वितरणानंतर पालकमंत्री नितेश राणे  यांनी उपस्थित आंबा-काजू बागायतदार शेतकऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये ह्या वर्षी ज्या त्रुटी निर्माण झाल्या होत्या तशा प्रकारच्या त्रुटी यापुढे निर्माण होणार नाहीत याची संबंधित विमा कंपन्यांनी दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे ही आवश्यक आहे. यापुढे फळ पिक विमा नुकसान भरपाई वितारणा करिता विलंब होणार नाही याबाबत विमा कंपनीला सूचना दिल्या. *विमा कंपनीच्या व्यस्थापक यांना योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्वं पात्र बागायतदार यांना देय विमा नुकसान भरपाई ची पूर्णत: रक्कम दिवाळीपूर्वी अदा करण्याच्या सूचना दिल्या.* विमा कंपनीने त्या मान्य केल्या.  यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकरी बांधव, उपस्थित अधिकारी, कर्मचारी  यांना दीपावलीच्या शुभेच्छा देखील दिल्या. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग भाग्यश्री नाईकनवरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जिल्ह्यातील १७ आंबा-काजू बागायतदार शेतकऱ्यांना प्रतिकात्मक धनादेशचे वितरण  अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. 

प्रतिकात्मक धनादेश वितरण करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची नावे खालील प्रमाणे

१. श्री. प्रभाकर राजाराम देसाई, मौजे. तळकट ता. दोडामार्ग

२. श्रीम. सोना संदेश चव्हाण, मौजे. कणकवली ता. कणकवली

३. श्री. विजय पंढरीनाथ तावडे, मौजे. कणकवली ता. कणकवली 

४. श्री. मानवेल जॉन डिसोजा, मौजे. ओरोस बु. ता. कुडाळ

५. श्री. अशोक हरी गांवकर, मौजे. ओरोस बु. ता. कुडाळ

६. श्री. मधुकर नारायण सावंत, मौजे. ओरोस बु. ता. कुडाळ 

७. श्री. लक्ष्मण सिताराम परब, मौजे. ओरोस बु. ता. कुडाळ 

८. श्री. वामन पांडुरंग परब, मौजे. पेंडूर  ता. मालवण 

९. श्री. रवींद्र सिताराम शिरसाट, मौजे. पेंडूर  ता. मालवण

१०. श्री. दत्ताराम राजाराम परब, मौजे. मडूरा  ता. सावंतवाडी 

११. श्री. ज्ञानेश पांडुरंग परब, मौजे. मडूरा  ता. सावंतवाडी

१२. श्री. साबाजी सोम परब, मौजे. मडूरा  ता. सावंतवाडी  

१३. श्री. विरोचन विजय धुरी, मौजे. वेतोरे  ता. वेंगुर्ला  

१४. श्री. प्रकाश महादेव गावडे, मौजे. वेतोरे  ता. वेंगुर्ला   

१५. श्री. रमेश गोविंद महाडिक, मौजे. फणसगाव ता. देवगड

१६. श्री. दिगंबर लक्ष्मण गाडगीळ, मौजे. वेतोरे  ता. वेंगुर्ला   

१७. श्री. विवेकानंद बळीराम बालम, मौजे. कसाल   ता. कुडाळ