
दोडामार्ग : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा दोडामार्गचा स्नेह मेळावा येथील महालक्ष्मी सभागृह दोडामार्ग येथे तालुकाध्यक्ष संतोष गवस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय प्राथमिक संघाच्या राष्ट्रीय संयुक्त चिटणीस विनयश्री पेडणेकर, राज्य उपाध्यक्ष म .ल.देसाई, जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, सरचिटणीस बाबाजी झेंडे, राज्य संघटक गुरुदास कुबल, माजी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब हरमलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय गावडे सरचिटणीस रुपेश गावडे, जिल्हा कोषाध्यक्ष पूनम पालव, जिल्हा महिला सेल सचिव सीमा पंडित, कुडाळ महिल सेल अध्यक्षा प्रणाली कविटकर आदी जिल्हा व राज्य पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्यात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित केलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा २०२५ च्या टॉप टेन यादीमध्ये आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. प्रथम क्रमांक यशवंत शाबी तुळसकर घोटगेवाडी, व्दितीय क्रमांक रश्मी उदय गवस पाळये, तृतीय क्रमांक मंगल कृष्णा झोळंबेकर झोळंबे, चवथा क्रमांक रमाकांत संदीप दळवी पाळये , शौर्य गणपत परीट पाटये, ईश्वरी समीर खुटवळकर घोटगेवाडी, पाचवा क्रमांक मयंक नितीन पवार शासकीय वसाहत, पूर्वा निलेश गवस पाटये, सहावा क्रमांक गौरी संदीप सावंत पाटये, सातवा क्रमांक पर्वणी शरद शेटये शासकीय वसाहत, काव्या विष्णू सावंत घोटगे, आठवा क्रमांक श्रावणी गणपत गवस बोडदे, नववा क्रमांक हर्षद सुभाष नांगरे सोनावल, दहावा क्रमांक दाजी महेश दळवी घोटगे नं १ व पियुष देविदास नाईक मणेरी नं १ या दोडामार्ग तालुक्यातील गुणवत्ता यादीत आलेल्या गुणवंतांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
त्याचप्रमाणे नवोदय विद्यालय निवड झालेल्या संभव अनिल ठाकर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी विठ्ठल उदय गवस, हर्ष महेश कासार, कृषी संतोष गवस, हर्षदा गुरुदास सावंत तसेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा सिंधुदुर्ग मधील रश्मी उदय गवस चौथी तर इस्त्रो सहलीसाठी निवड झालेली कुमारी जानवी विश्वास पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. इयत्ता दहावी-बारावी व पदवित्तर शिक्षण पूर्ण करून मध्ये गुणवंत ठरलेल्या पाल्यांचा गुणगौरव, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संदीप सावंत व संतोष गवस यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त उदय गवस व गणपती पाटील उषा व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उषा उदय गवस व स्नेहल सदानंद सावंत तर वर्षभरामध्ये सेवानिवृत्त झालेल्या विशाखा विष्णू खांबल, सविता विष्णू गवस , गुरुदास जनार्दन कुबल - केंद्रप्रमुख, जीवन रतिराम कडू , गीतांजली गोविंद मळीक, समिक्षा संतोष करमळकर यांचा या स्नेहमेळाव्यामध्ये सेवापूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला. माजी अध्यक्ष अप्पासाहेब हरमलकर तसेच शाळा स्तरावर विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धा शालेय परसबाग स्पर्धा तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. सेवाजेष्ठ महिलांचा नारीशक्ती सन्मान देऊन उचित गौरवण्यात आला. तसेच दोडामार्ग तालुक्यातील सर्व नवनियुक्त शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक व अखिल परिवारातील सर्व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सेल अध्यक्ष वंदना केरकर यांनी केले तर सूत्रसंचालन उमा कासार व उदय गवस यांनी केले.