चराठा ग्रामदैवत सातेरीचा शुक्रवारी जत्रोत्सव

Edited by:
Published on: December 22, 2024 13:39 PM
views 252  views

सावंतवाडी : शहरासह चराठा ग्रामदैवत असलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार २७ डिसेंबर रोजी होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणींची पाठीराखी अशी सातेरी देवीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सातेरी देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी सत्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. रात्री उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. जत्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकर मंडळी व देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.