देशभक्त शंकरराव गवाणकरमध्ये फ्रेशर्स पार्टी

Edited by: विनायक गांवस
Published on: July 23, 2025 20:19 PM
views 34  views

सावंतवाडी : लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयांमध्ये  फ्रेशर्स पार्टी साजरी करण्यात आली. आज प्रथम वर्षाच्या बीकॉम मॅनेजमेंट स्टडीज या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी पार पाडली.


या कार्यक्रमाला लोकमान्य ट्रस्टचे सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभूकेळुसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रवीण प्रभूकेळुसकर यांनी विद्यार्थ्यांना संस्थेची माहिती दिली. लोकमान्य ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ.किरण ठाकूर यांनी हे महाविद्यालय सुरू करून व्यवस्थापनाचे पदवीचे दालन सुरु केले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना चांगली नोकरी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे असे यावेळी प्रतिपादन केले. त्याचबरोबर महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे व्यवस्थापन करून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना यशस्वी कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक आनंद नाईक, साईप्रसाद पंडित, शैलेश गावडे, मेधा मयेकर, रवी पाटकर इतर कर्मचारी वर्ग अमरजी धोंड संतोष सावंत प्रवीण तुयेकर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी दूर्वा जामसंडेकर व आभार प्रदर्शन संघराज जाधव यांनी केले.