विनयभंगाच्या आरोपातून मुक्तता

Edited by:
Published on: June 27, 2024 14:35 PM
views 43  views

सिंधुदुर्ग : नवाबाग, उभादांडा, ता. वेंगुर्ला येथील आरोपी रोहीदास नामदेव मोर्जे याने तेथेच रहाणाऱ्या एका स्त्रीस तिच्याकडे बघून अश्लील चाळे करुन शिवीगाळ तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला म्हणून त्याच्याविरुध्द वेंगुर्ले पोलीसांनी भा.द.वि. कलम ३५४(अ)(१)(चार) प्रमाणे गुन्हा दाखल करुन वेंगुर्ले न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याकामी वेंगुर्ले येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, डी. वाय. रायरीकर यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपीची मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. मिहीर श्रीकृष्ण उर्फ अजित भणगे, ॲड. सुनिल मालवणकर, ॲड. तेजाली भणगे व ॲड. आशुतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले.

 

आरोपीत रोहीदास नामदेव मोर्जे याचेविरुध्द वेंगुर्ले पोलीसांनी भा.द.वि. कलम ३५४(अ)(१)(चार) प्रमाणे गुन्हा दाखल करुन वेंगुर्ले न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याकामी सरकारी पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. त्याकामी ॲड. मिहीर श्रीकृष्ण उर्फ अजित भणगे यांनी आरोपीतर्फे असा युक्तीवाद केला की, आरोपी हा मूकबधीर आहे. मात्र सरकारी पक्षाने आरोपी यास वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले असता आरोपी यास ऐकू व बोलता येते, असा कोणताही ठोस पुरावा सरकारी पक्ष सादर करु शकले नाही. शिवाय आरोपी व सदर स्त्री यांच्या कुटुंबामध्ये गेली २० वर्षेहून जादा काळ जमीन-जुमल्यावरुन वाद असून सदर बाब न्यायप्रविष्ठ आहे. आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राह्य मानून वेंगुर्ले येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, श्री. डी. वाय. रायरीकर साहेब यांनी आरोपीची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. मिहीर श्रीकृष्ण उर्फ अजित भणगे, ॲड. सुनिल मालवणकर, ॲड. तेजाली भणगे व ॲड. आशुतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले.