शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीत मुला - मुलींसाठी मोफत प्रशिक्षण..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 08, 2023 14:19 PM
views 81  views

देवगड : तालुक्यातील ‘शिरगांव क्रिकेट ॲकॅडमी’यावर्षीचे १४ वे वर्ष असून. या वर्षी ॲकॅडमीत मुला मुलींसाठी नियमीत लेदरबाॅल क्रिकेट सराव सुरु झालेला आहे. जास्तीत जास्त पालकांनी सकाळी ६ :३० ते ८ या कालावधीत त्यांच्या १४ व १६ वर्षांखालील मुलामुलींना नियमीत सरावासाठी पाठवावे, असे आवाहन शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीचे सर्वेसर्वा तथा मुख्य प्रशिक्षक सुधीर साटम यांनी केले आहे. शिरगांव क्रिकेट ॲकॅडमीचे लेदरबाॅल क्रिकेट साठी १४ व १६ वर्षांखालील वयोगटात आजपर्यंत २७ खेळाडू विविध स्तरांवर चमकले आहेत.

शिरगांव क्रिकेट ॲकॅडमी द्वारा नियमीत लेदरबाॅल क्रिकेट खेळाच्या मोफत प्रशिक्षणासोबतच या ॲकॅडमीत क्रिकेट संदर्भात इतर ‘करीअर ऑप्शन्स’ची माहिती व चर्चा, तज्ञांचे विशेष मार्गदर्शन तसेच जिल्ह्यातील लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धांमध्ये अधिकृत सहभाग अशा अनेक संधी मुला मुलींसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.