श्री साई इन्फोटेक येथे विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळणार मोफत
Edited by: विनायक गांवस
Published on: March 21, 2023 19:22 PM
views 197  views

 सावंतवाडी : येथील " श्री साई इन्फोटेक (SSi COMPUTER ) सावंतवाडी " येथे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ या मार्फत जिल्यातील युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मोफत शिकविले  जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साई इन्फोटेक (SSi COMPUTER ) सावंतवाडी ,चे श्री रघुनाथ तानावडे यांच्या मार्फत करण्यात आले आहे. 

         या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४५ इतके असले पाहिजे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. पुढील अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे . 1) Domestic Data Entry Operator (MS. Office, English, Marathi टायपींग) , 2) Account Executive (  Tally Prime ) कोर्से , Guest Service Executive (Front Office) (टूरिझम) या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे.   

तरी जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी केंद्राला भेट द्यावी, तसेच अधिक माहितीसाठी 9420740740 या नंबरवर संपर्क साधावा, किवा नोंदणी लिंक https://forms.gle/Tbg5tc3niRoczrk49 फॉर्म भरावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्ता श्री साई इन्फोटेक (SSi COMPUTER) , विठ्ठल मंदिर – मच्छी मार्केट रोड ,युको बँक आणि सावंतवाडी अर्बन बँकच्या मध्ये , द्वारकानाथ कॉम्प्लेक्स , सावंतवाडी