समर्थ चित्रपटगृहात “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपटाचा मोफत शो

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 01, 2024 11:30 AM
views 135  views

मालवण : मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपट शालेय तसेच महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना मोफत दाखविण्यात येणार आहे. शुक्रवार ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता समर्थ चित्रपटगृह देवबाग येथे मोफत शो विध्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहे. विध्यार्थ्यां सोबत एक पालक अश्या स्वरूपात दोन मोफत पास देण्यात येणार आहे.

मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपट शालेय तसेच महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना मोफत दाखविण्यात येणार आहे. शुक्रवार ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता समर्थ चित्रपटगृह देवबाग येथे मोफत शो विध्यार्थ्यांना दाखविण्यात येणार आहे. विध्यार्थ्यां सोबत एक पालक अश्या स्वरूपात दोन मोफत पास देण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय मधील शिक्षकांनी आपल्या शाळेतील तसेच महाविद्यालयातील जास्तीत जास्त विध्यार्थ्यानी याचा लाभ द्यावा. असे आवाहन सौरभ ताम्हणकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी सौरभ ताम्हणकर मोबा : 7588564887 व 9209333012 या क्रमांकावर संपर्क साधावा.