
कणकवली : कणकवली शहरातील 13 वायरमनना आज शुक्रवारी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मार्फत मोफत रेनकोट व एक महिला वीज कर्मचाऱ्याला छत्री देण्यात आली.
पावसाळ्यात या कर्मचाऱ्यांमार्फत कणकवली शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतात. हे कर्मचारी ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिवस शहर उजेडात ठेवण्यासाठी काम करत असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाचे रेनकोट देत त्यांचा गौरव माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी त्यांच्यासोबत हे सर्व वायरमन, महिला विद्युत कर्मचारी व शहरातील संदीप राणे, सागर होडावडेकर, नवराज झेमणे आदी उपस्थित होते.