फणसगाव दारूम गावामध्ये गवारेड्यांचा मुक्त संचार

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 17, 2024 12:35 PM
views 469  views

देवगड : देवगड तालुक्यातील फणसगाव येथील दारूम गावामध्ये गवारेड्यांचा मुक्त संचारा मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या परिसरात गवारेड्याचा वावर  आढळून आले असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.शिरगाव,कुवळे,चाफेड्ड, नंतर आता फणसगाव या गावा मध्ये ही गवा रेड्यांचा मुक्त संचार होऊ लागल्यामुळे सध्या येथील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गुरूवार १६ मे रोजी दुपारी च्या सुमारास फण सगावातील दारोम येथील परिसरामध्ये गवारेडे मुक्तपणे संचार करत असताना पहायला मिळाला. सध्या आंबा व काजू पिकाचा हंगाम असल्याने गावातील लोक आपल्या काजू बागेत आंबा बागेत असतात. तसेच या बागेत काम करण्यासाठी महिला वर्ग व पुरुष मंडळी देखील जात असतात.

येथील बागायतदारांच्या बागा या बहुतांशी जंगलमय भागात आहेत. याच परिसरात शेत जमिनीमध्ये येथील लोक येजा करत आहेत.शिरगाव मध्ये झालेल्या तीन घटना नुकत्याच ताज्या असताना आता फाणस गावातही गवारेडा दिसू लागल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे  सावट निर्माण झाले आहे. घराबाहेर पडावे तरी कसे असा प्रश्न येथील ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.फणसगाव भागातील बहुतांशी लोकांच्या आंबा काजूच्या बागा आहेत आणि या जंगलमय परिसरात असल्यामुळे या ठिकाणी येथील लोकांचा वावर सायंकाळी उशिरापर्यंत असतो मात्र आता गवारेड्याचा येथील बागांमध्येमधील संचार वाढू लागल्याने येथील बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याबाबतची खबरदारी म्हणून फणसगावात येऊन उपायोजना व समुपदेशन करावे. तसेच गावात जनजागृती मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.