
सावंतवाडी : सामान्य माणसाला उत्तम आरोग्य देण्यासाठी आयुष मंत्रालय, भारत सरकार स्वायत्त संस्थान संचलित अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा यांच्या संयोगाने चराठा ग्रामपंचायत हॉल सावंतवाडी येथे चराठे ग्रामपंचायतने विनामूल्य महाआरोग्य शिबिरचे आयोजन केले होते.या शिबिराचे उद्घाटन युवराज लखमराजे सावंत भोसले यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचा कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पंचक्रोशीतील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा विनामूल्य उपलब्ध व्हावी या उद्देशाने अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानाने या शिबिराचे आयोजन केले होते. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात यात सहभागी झाले होते. यावेळी चराठे ग्रामपंचायतचे सरपंच सौ.प्राचिती कुबल,उपसरपंच अमित परब,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष .समीर नाईक,लिब्रा ड्रग्स इंडिया लि. पुणेचे तारकेश सावंत तसेच चराठे गावचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य चराठे गौरी गावडे आणि राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा अँड सायली दुभाषी आदी उपस्थित होते.