
सावंतवाडी : शासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत कारिवडे येथे उद्या सकाळी १०.०० वा. तपासणी ते उपचार आरोग्य योजनेंतर्गत कारिवडे गावातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटूंबियांची मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. अशी माहिती सरपंच आरती अशोक माळकर यांनी दिली.
नोंदणीकृत सर्व बांधकाम कामगारांनी व त्यांच्या कुटुंबियांनी आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसे न केल्यास शासनाच्यावतीने देण्यात येणारे त्यापुढील सर्व लाभ मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी. तसेच आरोग्य तपासणी झाल्यावर बांधकाम कामगार व त्यांच्या कुटूंबियांना मोफत औषधे देण्यात येणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन कारीवडे सरपंच आरती अशोक माळकर यांनी केले आहे.