सावंतवाडी : कलंगुटकर आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर सावंतवाडीच्या डॉ. दिप्ती कलंगुटकर (एम. डी. आयुर्वेद) यांच्या उपस्थितीत आराध्या मेडिकल स्टोअर दुकानवाड, माणगाव येथे अस्थी संधी विकाराने ग्रस्त 104 रुग्णाची मोफत तपासणी आणि आयुर्वेदिक उपचार करण्यात आले. यावेळी झंडू फार्माचा सौजन्याने रुग्णाची बोन मिनरल डेनसिटी टेस्ट करण्यात आली. यावेळी नारुर शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष मनोहर दळवी ,डॉ.दिप्ती कलंगुटकर , श्रीवास लॅब माणगाव च्या संचालिका सौ. सुप्रिया पाटणेकर, संजय परब , झंडू फार्माचे श्री हिवरे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.