
सावंतवाडी : सावंतवाडी येथील चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा माध्यमातून संजीवनी रूग्णालय व यशराज रूग्णालयाच्या माध्यमातून उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
तसेच मंगळवारी गद्रे नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राघवेंद्र चितारी, सेक्रेटरी मंदार नार्वेकर, सहसचिव शेखर तेंडोलकर, खजिनदार योगेश सुराणा, सह खजिनदार राजेश काणेकर, उदय चितारी, गौरव दळवी, शुभम वर्दम, महेश चितारी आदींनी केले आहे.










