
वैभववाडी : येथील माणकेश्वर क्लीनीक यांच्यावतीने कै. कावेरीबाई काशीद यांच्या स्मरणार्थ जागतिक महिला दिनी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. शनिवारी दि.८ मार्च रोजी सकाळी १० ते ५ वेळेत क्लीनीकमध्ये हे शिबिर पार पडणार आहे.या शिबीराचे उद्घाटन नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांच्या हस्ते होणार आहे.शिबिरामध्ये रक्त तपासणी," रक्तदाब तपासणी, तसेच फक्त १०० रुपयात कार्डीओग्राम काढून मिळणार आहेत.या शिबिराचा लाभ सर्व रुणांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. दीपा पाटील यांनी केले आहे.