ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर !

माधवबागचं आयोजन
Edited by: जुईली पांगम
Published on: September 30, 2023 12:49 PM
views 137  views

कणकवली : चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह, ब्लडप्रेशर, कॉलेस्ट्रोल, हृदयरोग, लठ्ठपणा, संधिवात या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या सर्व आजारांवर वेळीच निदान, उपचार केल्यास पुढील गंभीर दुष्परिणाम टाळता येतात. यासाठी माधवबाग शाखांद्वारे ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वरील आजाराने त्रस्त असलेल्या तसेच अँन्जिओप्लास्टी व बायपासचा सल्ला दिलेल्या ज्येष्ठ नागरिक रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 1 ऑक्टोबर 2023 ला स.10 ते सायंकाळी 6 या वेळेत करण्यात आले आहे. 

या तपासणीमध्ये ब्लडप्रेशर, ब्लड शुगर, हार्ट रेट आणि वैद्यकीय सल्ला तसेच गरजेनुसार ECG, TMT या तपासण्या मोफत केल्या जातील. तरी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याच आवाहन माधवबागच्यावतीने करण्यात आलय.  

नावनोंदणीसाठी संपर्क 

माधवबाग कणकवली : 9373183888 

माधवबाग कुडाळ : 9011328581

माधवबाग सावंतवाडी : 7774028185