दोडामार्गात 11 जूनला मोफत आरोग्य तपासणी - चिकित्सा शिबीर

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा आणि नगरपंचायत कसई - दोडामार्ग यांचं संयुक्त आयोजन
Edited by: संदीप देसाई
Published on: June 08, 2023 11:22 AM
views 120  views

दोडामार्ग : अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा, आयुष मंत्रालय, भारत सरकार के अंतर्गत स्वायत्त संस्थान आणि नगरपंचायत कसई दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग येथे ११ जून ला मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.

रविवारी ११ जून ला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत पिंपळेश्वर हॉल, बाजारपेठ, दोडामार्ग येथे हे शिबिर होणार आहे. या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, हाडांचे व सांध्यांचे आजार, थायरॉईड, अॅलर्जी व दमा श्वसन विकार पक्षाघात, वात विकार, त्वचाविकार, बालरोग, लिव्हर व किडणी विकार, मधुमेह, मूळव्याध, स्त्रीरोग, अन्य जुनाट विकार यावर मोफत तपासणी व मोफत औषधें दिली जाणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण व आरोग्य सभापती सौ. गौरी पार्सेकर यांनी केलंय.