
वेंगुर्ले : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन ठाकूर कॅशुज, मठ, ता. वेंगुर्ले, संजीवनी हॉस्पिटल, कणकवली व कोल्हापूर कॅन्सर हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंतच्या वेळेत मठ-टाकयेवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व शिबीरात रक्त तपासणी, औषधे, स्टोन, कॅन्सर पूर्व तपासणी, मधुमेह पेशंटसाठी HbA1C तसेच पुरुषांसाठी CBC, Sr. Creat, Sr. Uric acid, Lipid profile, CA 19-9, महिलांसाठी CBC, Sr. Creat, Sr. Uric acid, Lipid profile, CA 125 या सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.
या आरोग्य तपासणी शिबीरात तज्ज्ञ डॉ. रक्षदा घाडी, (Preventive Oncologist) संजीवनी हाँस्पीटल कणकवलीच्या डॉ. सिमीरा रावराणे, मठ येथील डॉ. हर्षाली ठाकूर, संजीवनी हॉस्पिटल कणकवली चे डॉ. विध्याधर तायशेट्ये हे उपस्थित राहून तपासणी करणार आहेत.
या मोफत आरोग्य शिबीरास महालॅब, उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ले यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी 9404445509, 9404955665, 9405820588 या नंबर वर संपर्क साधून नावनोंदणी करावी. या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.