सावंतवाडी : अथायु हॉस्पिटल कोल्हापूर व सिंधुदुर्ग विविध उपजिल्हा रुग्णालय यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीर दिनांक १३ जानेवारी ते १५ जानेवारी अनुक्रमे कणकवली, सावंतवाडी, शिरोडा ह्या उपजिल्हा रुग्णालयमध्ये सकाळी ११ ते २ या वेळेत आयोजित केले आहे.
या शिबीरामध्ये मोफत हृदयविकार, अँजिओग्राफ़ी, पित्ताशात खडे, मुतखडा, प्रोस्टेट, कॅन्सर, केमोथेरपी, व्हेरिकोज व्हेन्स, मणका तपासणी होणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अत्तर्गत अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयाचे व्हॉल्व बदलणे, दुर्बिणीद्वारे मुतखडा , प्रोस्टेट,दुर्बिणीद्वारे पित्ताशाचे खडे, हाडाचे फ्रॅक्चर, सर्व प्रकारचे कॅन्सर, डायलेसीस, लेसर द्वारे व्हेरिकोज व्हेन्स, हे उपचार सर्व रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहेत. तसचे शिबीर दिवशी ई.सी.जी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी मोफत करण्यात येणार असून नाव नोंदणीसाठी ८९२८७३६९९९ या नंबर संपर्क करावा तरी जास्तीत जास्त सिंधदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकां मार्फत करण्यात आले आहे.