माधवबागच्यावतीने 13 सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

Edited by: ब्युरो
Published on: September 10, 2023 14:00 PM
views 98  views

कणकवली : माधवबागच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. बुधवारी 13 सप्टेंबर 2023 स. 10 ते सायं 6 यावेळेत ही तपासणी होणार आहे. 


या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, ब्लॉकेजेस, संधिवात, लठ्ठपणा, थायरॉईड ,रुग्णांसाठी आरोग्य तपासणी होणार आहे. तसेच या तपासणी अंतर्गत ECG-350 मोफत, TMT - 200/- / Walk test मोफत, रँडम ब्लड शुगर - 100/- मोफत, डॉक्टर कन्सल्टेशन 350/- मोफत, एकूण येणारा खर्च - 1000/- पूर्णपणे मोफत होणार आहे. 


ज्या रुग्णांना वरील आजार किंवा त्या संबंधी लक्षणे असतील, अशाच रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल, अशी माहिती देण्यात आलीय. अधिक माहितीसाठी संपर्क : कणकवली : 9373183888, कुडाळ 9011328581, सावंतवाडी : 7774028185. या मोफत शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.