
देवगड : देवगड येथे आयोजित केलेल्या गाबीत समाज सिंधुदुर्ग व गाबीत समाज देवगड यांच्या सौजन्याने अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
यावेळी या मोफत आरोग्य शिबिरात मेहता हॉस्पिटलचे डॉक्टर नेत्र चिकित्सक तेजस कोडगिरपार ,मुसद्दीक नदाफ, (जनरल फिजिशियन) मेहता हॉस्पिटलचे व्यवस्थापक अश्फाक मुल्ला, असिस्टंट डॉ. सुशांत कोकाटे,सुप्रिया ताटे, निकिता कारंडे, सिस्टर माधुरी जाना यांनी सहभाग घेतला होता. हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी गाबीत समाज देवगडचे पदाधिकारी संजय पराडकर, लक्ष्मण तारी, रमेश तारी सुहास पराडकर, संजय बांदेकर, धर्मराज जोशी, महादेव मुणगेकर, अजित टाककर, अश्विनी धुरी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मेहता हॉस्पिटल सांगली यांच्या सहाय्याने या शिबिरात प्रामुख्याने हृदयाचे आजार, हाडांच्या शस्त्रक्रिया, डोळ्यांचे आजार मूत्रविकार, जनरल सर्जरी व मेडिसिन, मेंदूच्या शस्त्रक्रिया याविषयी तपासणी करण्यात आली.