सावंतवाडीत ८ फेब्रुवारीला सत्यवान रेडकर यांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

Edited by:
Published on: February 03, 2025 15:46 PM
views 55  views

सावंतवाडी : सावंतवाडीत ८ फेब्रुवारीला सत्यवान रेडकर यांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन होणार आहे. निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान देणार असून कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नाही. फक्त वही व पेन सोबत असू द्यावे व निशुल्क मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण बोर्ड अव्वल स्थानावर असतो. परंतु स्पर्धा परीक्षेत हे गुणवत्ताधारक विद्यार्थी अपेक्षित प्रमाणात दिसून येत नाहीत. बहुतेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती महागडे क्लासेस किंवा ॲकॅडमी लावण्याची नसते. अशा वेळेस शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडावे व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन निर्माण व्हावे यासाठी संपूर्ण कोकणात "तिमिरातूनी तेजाकडे" ही शैक्षणिक चळवळ यशस्वीरित्या राबवून प्रशासनात कोकणातील टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्नशील असणारे व आपल्या निशुल्क मार्गदर्शन व्याख्यानांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा, पुढील वाटचालीसाठी दिशादर्शक मार्गदर्शन करणारे सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार हे शनिवार ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता, श्री पंचम खेमराज महाविद्यालय, मोती तलाव शेजारी, सावंतवाडी तसेच सकाळी १०.३० वाजता, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, सावंतवाडी या ठिकाणी विद्यार्थ्यांना निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान देणार आहेत. कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नाही, फक्त वही व पेन सोबत असू द्यावे व निशुल्क मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.