
देवगड : उद्या शुक्रवार दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी २.०० वाजता तळेबाजार ता. देवगड येथील महात्मा गांधी विद्या मंदिर या प्रशालेच्या सिद्धिविनायक सांस्कृतिक हॉल येथे तिमिरातुनी तेजाकडे
या मोहिमेचे प्रमुख व मुंबई येथे कनिष्ठ अनुवाद अधिकारी असलेले सत्यवान यशवंत रेडकर यांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित केले आहे. सदर व्याख्यानाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी अवश्य घ्यावा, असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष संदीप तेली यांनी केले आहे. सदर उपक्रमाचे संयोजक मुख्याध्यापक नंदन घोगळे, शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब कोकरे, संस्था प्रतिनिधी राजेश वाळके, सांस्कृतिक विभाग प्रमुख
मृण्मयी जाधव असून तळेबाजार दशक्रोशीतील विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे कळविले आहे.